"ईव्हीएम हटवा, देश वाचवा", विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी - MAHARASHTRA ASSEMBLY WINTER SESSION
Published : 5 hours ago
नागपूर : ‘संविधान वाचवा, ईव्हीएम हटवा’, ‘ईव्हीएम हटवा, देश वाचवा’, ‘ईव्हीएम सरकार हाय हाय’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदारांनी विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session 2024) पहिल्याच दिवशी सरकारवर हल्ला चढवला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) अनपेक्षित निकाल लागल्याची भावना व्यक्त होत असून अनेक ठिकाणी घोळ झाला असल्याची चर्चा होत आहे. असं असतानाच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (16 डिसेंबर) विरोधकांनी ईव्हीएमविरुद्ध (EVM) आंदोलन पुकारलं. शिवसेना (उबाठा) आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची उपस्थिती होती. त्यानंतर विधानभवन परिसर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे म्हणाले, "ईव्हीएम हे लोकशाही, राज्यघटनेसाठी घातक आहे. विधानसभा निवडणुकीतील मतदानामध्ये ठिकठिकाणी जो घोळ झालाय, त्यावरुन आमचा ईव्हीएम विरोधात रोष आहे."