मतदान प्रक्रियेला सुरुवात, राम नाईक यांनी बजावला पहिला मतदानाचा हक्क; म्हणाले...
Published : 4 hours ago
मुंबई : राज्यात आज (20 नोव्हेंबर) सकाळपासूनच विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी देखील मुंबईतील गोरेगाव येथील पहाडी शाळेत मतदानाचा हक्क बजावलाय. राम नाईक 1960 साली गोरेगाव येथे राहायला आले होते. तेव्हापासून आतापर्यंत जितक्या निवडणुका झाल्या त्यासर्व निवडणुकांमध्ये त्यांनी सर्वात पहिला मतदानाचा हक्क बजावलाय. यंदाही त्यांनी सर्वप्रथम मतदान केलं. त्यानंतर राम नाईक म्हणाले, "नेहमीप्रमाणे यंदाही मी सर्वात अगोदर मतदान केलं. याचा मला अभिमान आहे. सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडावं", असं आवाहनही त्यांनी केलं. पुढं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत ते म्हणाले, "2019 च्या निवडणुकीनंतर जनादेश शरद पवार यांच्या विरोधात गेल्यावर त्यांनी विरोधात बसण्याचं काम केलं. परंतु, त्यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीनं काम केलंय ते बघता विरोधकांचं काम करण्यात सुद्धा ते अकार्यक्षम राहिलेत."