मतदानाला उत्साहात सुरुवात, अक्षय कुमारसह ‘या’ सेलिब्रिटींनी केलं मतदान - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024
Published : May 20, 2024, 11:00 AM IST
मुंबई Mumbai Lok Sabha : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज (20 मे) पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात आज मतदानाचा शेवटचा टप्पा आज असून मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 जागांवर मतदान होत आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळपासून सर्वसामान्य नागरिकांसह अनेक सेलिब्रिटींनीही मतदानाचा अधिकार बजावला. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या सेंट ॲन्स स्कूलमध्ये आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्याचप्रमाणे बॉलीवूड मधील खिलाडी अक्षय कुमार हा देखील आज सकाळी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्याचं बघायला मिळालं. भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमार यानं पहिल्यांदाच मतदान केलं. ‘माझा भारत विकसित आणि मजबूत राहावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. हीच एक गोष्ट लक्षात ठेवून मी मतदान केलं' असं यावेळी त्यानं नमूद केलं.