महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

नुकतेच शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले अभिनेता गोविंदा खोटारडे, राम नाईक यांचा घणाघात - Lok Sabha Election 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 2:22 PM IST

मुंबई Ram Naik Criticized Govinda : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर वयाची 90 वी पार केलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी आज सकाळीच मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ईटीव्ही भारतशी संवाद साधत असताना राम नाईक म्हणाले, "मी सकाळी साडेसहा वाजेपासून रांगेत उभा होतो. नेहमीप्रमाणे यंदाही मी सर्वात अगोदर मतदान केलं याचा मला अभिमान आहे. सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडावं", असं आवाहनही त्यांनी केलं. पुढं अभिनेता गोविंदा यांच्यावर टीका करत ते म्हणाले की, "गोविंदा यांनी आपण राजकारणातून संन्यास घेणार असून यापुढं कधीही राजकारणात दिसणार नाही, असं वक्तव्य वारंवार केलंय. मात्र, आमचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत ते प्रचाराच्या माध्यमातून पुन्हा राजकारणात सक्रिय झालेत. मात्र, त्यांनी राजकारणात पुन्हा प्रवेश केल्यामुळं ते खोटारडे असल्याचं दिसून येतंय." 

ABOUT THE AUTHOR

...view details