विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान! वनविभागाच्या अथक प्रयत्नांना यश - Pune Leopard News - PUNE LEOPARD NEWS
Published : Jul 19, 2024, 10:09 AM IST
मंचर Leopard Rescued From The Well : पुणे जिल्ह्यातील मंचरजवळील तांबडे मळ्यात गुरुवारी (18 जुलै) रात्री दीड वाजेच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली. आज (19 जुलै) सकाळी ही बाब लक्षात येताच शेतकऱ्यानं त्वरित वन विभागाला याची माहिती कळवली. त्यानंतर वन विभागाच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलंय. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. याबाबत विहीर मालकानं माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "सकाळी उठल्यानंतर विहिरीत पाण्याचा खळखळ आवाज मोठ्या प्रमाणात येत होता. विहिरीत बघितल्यावर बिबट्या दिसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ यासंदर्भातील माहिती आसपासच्या नागरिकांना तसंच वन विभागाला कळवली. त्यानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढत जेरबंद करण्यात आलं."