'व्हू इज धंगेकर'ची वर्षपूर्ती; आमदार रवींद्र धंगेकर मतदारांच्या भेटीला - Kasba Constituency
Published : Mar 2, 2024, 9:01 PM IST
पुणे Ravindra Dhangekar : लवकरच देशभरात लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. पुण्यात देखील काँग्रेससह भाजपाच्या इच्छुक उमेदवारांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. मागच्या वर्षी आजच कसबा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. कसबा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आमदार रवींद्र धंगेकर आज सकाळपासून मतदारसंघात मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. वर्षपूर्तीनिमित्त आमदार रवींद्र धंगेकर यांच्या भेटीगाठी असल्या तरी, लोकसभा निवडणुकीचीच चर्चा होत आहे. यावेळी सर्व मतदार संघाचे आभार मानत त्यांचं ऋण फेडण्यासाठी मी मतदार संघात फिरत असल्याचं आमदार धंगेकर म्हणाले. याबाबत कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याशी इटीव्ही भारतनं खास संवाद साधलाय.