महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

जळगाव शहरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार; घराजवळ सापडली मोटारसायकल - JALGAON NEWS

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2024, 10:57 AM IST

Updated : Nov 18, 2024, 12:33 PM IST

जळगाव : जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अहमद हुसैन शेख यांच्या घरावर पहाटे 4 वाजता गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच निवडणूक विभागाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, अहमद हुसैन शेख झोपलेले असताना एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या घराच्या दिशेनं तीन गोळ्या झाडल्या. मोठा आवाज आल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली. तेव्हा त्यांना दिसलं की काचेच्या खिडकीचा चक्काचूर झालाय. तर पोलीस तपासादरम्यान रस्त्यावर तीन रिकामी काडतुसं आढळून आली. तसंच झडतीदरम्यान खोलीत एक गोळी सापडली. या घटनेचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत. दरम्यान, अहमद हुसैन शेख हे एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष आहेत. पक्षाकडून त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळं ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. 

Last Updated : Nov 18, 2024, 12:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details