केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हजारोंनी केला योगाभ्यास; पाहा व्हिडिओ - International Yoga Day 2024 - INTERNATIONAL YOGA DAY 2024
Published : Jun 21, 2024, 1:50 PM IST
नागपूर Nitin Gadkari Yoga Nagpur : आज (21 जून) जगभरात 'आंतरराष्ट्रीय योग दिन' अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. योगसाधना शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. यंदाचा हा 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन असून यानिमित्तानं लोकांना योगासनाचं महत्व पटवून देण्यासाठी देशभरात योगाशी संबंधित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर नागपूर येथील यशवंत स्टेडियमवर देखील शेकडोंच्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी देशाचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासह शेकडोच्या संख्येनं नागपूरकर आवर्जून उपस्थित होते. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं या योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ,पतंजली संस्था आणि याशिवाय अनेक स्वयंसेवी संस्थानी देखील सहभाग घेतला होता. जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी योग प्रात्यक्षिकं सादर केले.