महिला अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी पुण्यात अनोखा फॅशन शो; पाहा व्हिडिओ - Awareness Against Women Oppression
Published : Sep 24, 2024, 12:53 PM IST
पुणे Unique Fashion Show In Pune : बलात्कार करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा करा, गुन्हा होताना तो केवळ मोबाईलमध्ये रेकॉर्ड न करता तो गुन्हा थांबवण्यासाठी पुढाकार घ्या, महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध राहा, असा संदेश देत महिलांवरील अत्याचाराबाबत भाष्य करणारा एक आगळा वेगळा फॅशन शो सोमवारी (23 सप्टेंबर) पुण्यात पार पडला. कशीश सोशल फाउंडेशन आणि कशीश प्रॉडक्शनच्या वतीनं 'मिस, मिसेस, मिस्टर, किड्स इंडिया ईलाईट-इंडिया आयकॉन 2024' फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. अलीकडच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर असे प्रकार घडण्यापासून थांबवण्याची देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या फॅशन शोच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं काम करत असल्याचं आयोजकांनी सांगितलं. तर संपूर्ण भारतातून 3 वर्षे वयोगट ते 55 वर्षे असे एकूण 75 स्पर्धकांना या कार्यक्रमामध्ये निवडण्यात आले होते.