गेलेल्या आमदारांना परत घेणार का? जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडिओ - Jitendra Awhad - JITENDRA AWHAD
Published : Jun 22, 2024, 10:17 AM IST
पुणे Jitendra Awhad News : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातील अनेक आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "माझ्या संपर्कात कोणीही नाही. ज्यांच्या संपर्कात आहे ते लोक याविषयी बोलत असतील." तसंच यावेळी आव्हाडांना पक्ष सोडून गेलेल्या आमदारांना परत घेणार का? असं विचारलं असता "ही श्रींची इच्छा" असं ते म्हणाले. पुढं ओबीसी आणि मराठा वादासंदर्भात प्रतिक्रिया देत ते म्हणाले की, "महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ बिघडू देऊ नका, अशी माझी पहिल्यापासून भूमिका होती. राज्यातील जातीय सलोखा बिघडवण्याचं काम या सरकारनं केलंय. आज राज्यात जी परिस्थिती निर्माण झालीय, त्याला सरकारच जबाबदार आहे", असा आरोपही आव्हाडांनी केला.