स्लीपर बसनं घेतला पेट, उड्या मारून प्रवाशांनी वाचविले प्राण - SLEEPER BUS FIRE
Published : Nov 4, 2024, 7:25 AM IST
लखनौ- उत्तर प्रदेशमध्ये प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी स्लीपर बसनं अचानक पेट घेतला. ही आगीची दुर्घटना रविवारी रात्री सादाबाद कोतवाली भागातील यमुना महामार्गावर मिढावली गावाजवळ घडली. स्लीपर बसला अचानक आग लागल्यानंतर प्रवाशांनी जीवाच्या आकांतानं बसमधून उडी घेतली. स्लीपर बस आगीनं पेटल्यानंतर लोकांनी गर्दी केली. स्थानिकांनी बस दुर्घटनेची माहिती पोलिसांसह अग्नीशमन दलाला कळविली. घटनास्थळी आलेल्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी बसला लागलेली आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली. काही कळायच्या आत आग पूर्ण बसमध्ये पसरली. प्रवाशांनी बसमधून उड्या घेत स्वत:चे प्राण वाचविले. सुदैवानं आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसला आग कशी लागली? याबाबत अद्याप स्पष्ट अशी माहिती समोर आलेली नाही.