महाराष्ट्र

maharashtra

Live : 'गुरुपौर्णिमा' उत्सवानिमित्त साईनगरी भक्तांनी गजबजली, पहा लाईव्ह दर्शन - Guru Purnima 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 21, 2024, 6:48 AM IST

Updated : Jul 21, 2024, 7:30 AM IST

शिर्डी गुरूपौर्णिमा 2024 (ETV Bharat)
शिर्डी GURUPURNIMA FESTIVAL SHIRDI : दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त (GURU PURNIMA 2024) साईनगरी शिर्डी ही भक्तांनी गजबजली आहे.  साईबाबा संस्थानच्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवास (GURU PURNIMA IN SHIRDI) शनिवारी (20 जुलै) पहाटे प्रारंभ झाला. पहाटे काकड आरती मंगलस्थानानंतर 'साई चरित्र' ग्रंथाची मिरवणूक काढून या उत्सवाला सुरुवात झाली. साई भक्तांच्या सेवेसाठी साई संस्थान सज्ज असून शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आलाय. दरम्यान, साईबाबा हयात असल्यापासून गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठ्या उत्‍साहात साजरी केली जात आहे. त्‍यामुळं या दिवसाला आजही अनन्‍यसाधारण महत्त्‍व आहे. साईबाबांवर श्रद्धा असणारे असंख्‍य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीत येऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेतात.  या उत्‍सवास हजेरी लावतात. यंदाही गुरुपौर्णिमा उत्‍सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन साईबाबा संस्थानच्यावतीनं करण्यात आलंय.  
Last Updated : Jul 21, 2024, 7:30 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details