महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेंनी शासनासह सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांचे टोचले कान; नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडिओ - HARIBHAU BAGADE IN SHIRDI

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2025, 10:36 AM IST

शिर्डी : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि राज्य शासनाचा सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'आंतरराष्ट्रीय सहकार परिषद 2025' चं उद्घाटन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलत असताना हरिभाऊ बागडेंनी राज्य शासनाच्या सहकार विभागाबरोबरच सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांचे कान टोचले. ते म्हणाले, "इंग्रजांनी सहकार कायदा पास केल्यानंतर सहकारी संस्थांवर डीडीआरची नेमणूक केली गेली. मात्र, सहकारी संस्थांमधील चुका लपवण्याचा मार्गही त्यांनीच दाखवला. असं व्हायला नको होतं. त्यामुळं हळू-हळू संस्थेत भ्रष्टाचार शिरु लागला. काही लोकांनी सहकार चळवळीला बदनाम करायचं काम केलं. परंतु, सहकार चळवळीतील संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालविल्यास सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल."

ABOUT THE AUTHOR

...view details