मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील भूकंपाचे हादरे बसल्यानं नागरिकांची पळापळ, 'या' जिल्ह्यात आहे मुख्य केंद्र - EARTHQUAKE IN HINGOLI - EARTHQUAKE IN HINGOLI
Published : Jul 10, 2024, 9:39 AM IST
|Updated : Jul 10, 2024, 9:59 AM IST
नांदेड- मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत. परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यातील काही भागात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भूंकपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाचे धक्के बसताच अनेक नागरिक घराबाहेर पळाले. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यात 4.5 रिस्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे आखाडा बाळापूर हे भूकंपांचे केंद्र होते. सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे आहेत. कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.