"लाखो पवार आहेत, पण बिचुकले फक्त एकच"; अभिजीत बिचुकलेंनी दिलं थेट पवारांना आव्हान - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
Published : Nov 8, 2024, 8:59 PM IST
पुणे : राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडं अजित पवार तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाने युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्याने बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होत आहे. दोन्ही पवारांकडून बारामतीत जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच बारामती विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजीत बिचुकले हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बारामती मतदारसंघात अनेक गावांमध्ये अजूनही पाणीच नसल्यानं डॉक्टर अभिजीत बिचुकले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. बारामती विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर अभिजीत बिचुकले यांच्याशी आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने खास बातचीत केली आहे. पाहा संपूर्ण व्हिडिओ