शिर्डी दीपोत्सव: हजारो दिव्यांच्या प्रकाशानं उजळली साईनगरी, पाहा व्हिडिओ
Published : 5 hours ago
शिर्डी : दिवाळीच्या निमित्तानं शिर्डीतील साईबाबा मंदिर आणि परिसर दिव्यांनी लखलखून गेलाय. साई मंदिरासह संपूर्ण शिर्डी विद्युत रोषणाईनं नटून गेली आहे. गुरुवारी (31 ऑक्टोबर) साईबाबांच्या द्वारकामाई समोरील प्रांगणात भाविकांनी भक्तिमय वातावरणात दीपोत्सव साजरा केला. यावेळी भाविकांनी पेटवलेल्या दिव्यांनी अवघा आसमंत उजळून निघाला होता. असं मानलं जातं की, याच दिवशी साईबाबांनी अनेक वर्षांपूर्वी पाण्यानं दिवे पेटवले होते. शिर्डीत साईबाबांचं एका पडक्या प्रार्थनास्थळात वास्तव्य होतं. साई मंदिरामध्ये पारंपारिक पद्धतीनं दिवाळी सण साई संस्थानच्या वतीने साजरी केला जातो. कागद आणि बांबूच्या कामट्यापासून तयार केलेला आकर्षक आकाश कंदील साई मंदिर परिसरातील 4 नंबर प्रवेशद्वाराचा आतील बाजूस लावण्यात आलाय. दिवाळीच्या या शुभ मुहर्तावर प्रत्येक जण मोठ्या उत्साहात दिप प्रज्वलीत करून शिर्डीत बाबांच्या सानिध्यात दिवाळी साजरी करतात. भक्तांनी लावलेल्या हजारो दिव्यांनी साई मंदिर लखलखून जाते.