महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मुख्यमंत्र्यांच्या आशेवर आम्ही जगतो; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी पालखीत व्यक्त केल्या भावना - Ashadhi Wari - ASHADHI WARI

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 7:12 PM IST

पुणे Ashadhi Wari 2024 : संत ज्ञानेश्वर महाराज तसंच संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं लाखो भाविकांच्या मांदियाळीत आषाढी वारीसाठी पंढरपूरकडं प्रस्थान झालं. आज पालखीचा रविवारी पुणे शहरात प्रवेश झालाय. त्यानुसार प्रशासनानं सर्व तयारी केली आहे. त्यामुळं चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी हातात फलक घेऊन सहभाग घेतला. "ज्या चुका आमच्या वडिलांनी केल्या, तशी चूक तुम्ही करू नका," असा संदेश मुलांनी दिला. "आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री आले. त्यांनी आम्हाला केवळ आश्वासनं दिली. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आम्हाला मदतीचं आश्वासन दिलं आहे. त्यांनी  दिलेल्या आशेवर आम्ही जगत आहोत," असं या मुलांनी तसंच पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी सांगितलं.

ABOUT THE AUTHOR

...view details