महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मराठा आरक्षणावर छगन भुजबळांची कडक प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडिओ - chhagan bhujbal aggressive

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 1:43 PM IST

Updated : Jan 27, 2024, 2:12 PM IST

नाशिक Chhagan Bhujbal On Maratha Reservation :  गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या मराठा आरक्षणाबाबत सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला असून मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. दरम्यान, यावरच आता ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "मराठा समाजाचा विजय झाला असं तूर्त वाटतंय, पण झुंडशाहीनं कायदे, नियम बदलता येत नाहीत. आम्ही शपथ घेताना कोणालाही न घाबरता काम करु अशी शपथ घेतो. पण, आता जे झालंय ती एक सूचना आहे. सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेवर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे आणि इतर समाजातील वकील असतील, त्यांनी याचा अभ्यास करुन यावर हरकती लाखोंच्या संख्येनं पाठवाव्यात. जेणेकरुन सरकारला लक्षात येईल, की याबाबत दुसरीही बाजू आहे."

Last Updated : Jan 27, 2024, 2:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details