महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर 'बर्निंग बसचा थरार'; 36 प्रवासी बालंबाल बचावले, पाहा व्हिडिओ - Burning Bus - BURNING BUS

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 11:13 AM IST

मावळ Burning Bus On Pune Mumbai Expressway : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मावळ तालुक्यातील आढे गावाजवळ पुणे मार्गिकेवर एका खासगी प्रवासी बसचा टायर फुटल्यानं अचानक पेट घेऊन लागलेल्या आगीमध्ये बस जळून खाक झाली. या बसमध्ये 36 प्रवासी होते. प्रसंगावधान राखत सर्व प्रवासी आणि चालक हे बसमधून बाहेर पडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडलीय. सकाळी साडेसात वाजता आढेगावच्या हद्दीत या खासगी बसचा टायर फुटला. त्यामुळं बस जागेवरच पलटली. त्यानंतर शॉर्ट सर्किट झाल्यानं संपूर्ण बसनं पेट घेतला. या बसमध्ये 36 प्रवासी होते. ही बस पुण्याच्या दिशेनं जात असताना टायर फुटला आणि त्यानंतर शॉर्ट सर्किट झाल्यानं बसला आग लागली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नानं आग विझवण्यात आली. एक्सप्रेस वे वरुन गावांना जोडणाऱ्या पुलाखालीच ही घटना घडल्यानं पुलावर काही काळ धुराचा लोट उसळला होता. सदर घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

ABOUT THE AUTHOR

...view details