महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

चक्क शिवसैनिकांना दारूची झिंग! जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी; पोलिसांनी घेतलं ताब्यात - Shivsena drunk workers - SHIVSENA DRUNK WORKERS

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 2, 2024, 8:38 PM IST

बुलढाणा : Shivsena drunk workers : दारूच्या नशेत माणूस काय करेल याचा अंदाजच लावता येत नाही. अशाच दोन शिवसैनिकांनी खासदार प्रतापराव जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर महायुतीच्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सभा संपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व प्रकार आज मंगळवार (दि. 2 एप्रिल) रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडला आहे. मेहकर येथील राजेश सोनूने आणि विनोद खंडारे असं धिंगाणा घालणाऱ्याचं नाव असून, त्यांनी जिल्हाधिकारी परिसरात 'कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला' अशी घोषणाबाजी केली. हे कार्यकर्ते शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचे कार्यकर्ते असल्याचं ते सांगत होते. पण त्याचं हे कृत्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. पण ते समजावण्याच्या स्थितीत नसल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेऊन तपासणी करण्यात आली आहे. मात्र, एवढे पोलीस कर्मचारी तैनात असताना हे जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात आलेच कसे. असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details