Ashok Chavan Gherao : अशोक चव्हाणांना मराठा समाजाने घातला घेराव, चव्हाणांनी घेतला काढता पाय - Ashok Chavan Vs Maratha Community - ASHOK CHAVAN VS MARATHA COMMUNITY
Published : Apr 1, 2024, 8:20 PM IST
नांदेड Ashok Chavan Gherao : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सूचित करूनही मराठा आरक्षणाची धग मात्र अजूनही कायम आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांना हाकलून दिलयं. नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगानं ते कोंढा गावात मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आले होते. 'एक मराठा-लाख मराठा' सह विविध घोषणा देत मराठा बांधव संताप व्यक्त करत होते. गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. शेकडो जणांचा रोष पाहून अशोक चव्हाण यांनीही काढता पाय घेतला. नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या काळात विविध पक्षांच्या नेत्यांना गावबंदीचा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रचार काळात मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागणार अशी चिन्हं दिसत आहेत.