भिवंडीत अग्नितांडव! डायपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, पाहा व्हिडिओ - Bhiwandi Fire - BHIWANDI FIRE
Published : Jun 11, 2024, 8:05 AM IST
मुंबई Bhiwandi Fire News : भिवंडीमध्ये डायपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीमुळं परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच अग्निशमन दलाकडून सध्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप तरी समोर आलेलं नाही. मात्र, आगीत कंपनीचं मोठं नुकसान झाल्याचं बघायला मिळतंय. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यात सरवली एमआयडीची परिसरात सदाशिव हायजिन प्रा.ली ही डायपर बनवण्याची कंपनी आहे. आज (11 जून) पहाटे तीन वाजेच्या सुमारास कंपनीला अचानक आग लागली. बघता-बघता आगीनं रौद्ररुप धारण केलं आणि संपूर्ण कंपनीला आगीनं विळखा घातला.