राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त अयोध्येत उत्साह, पाहा व्हिडिओ - रामल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा
Published : Jan 22, 2024, 9:03 AM IST
|Updated : Jan 22, 2024, 2:53 PM IST
Ayodhya Ram Mandir LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्या राममंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाचं साक्षीदार होण्यासाठी देशभरातून सुमारे 8 हजार सेलिब्रिटी आणि राजकीय नेते अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्यानगरी अवघी राममय झाली आहे. अयोध्येतील राम मंदिरावर रोषणाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांचे मंत्रीदेखील अयोध्येत आज दाखल होणार आहेत. अयोध्येत विविध लोककलांचे सादरीकरण होणार आहे. राम मंदिर सोहळ्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. देशभरातून अनेक साधू आणि महंत अयोध्येत दाखल होणार आहेत. प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोमवारी आज दुपारी 12.15 ते आणि 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. पंतप्रधान मोदी 8 हजारांहून अधिक लोकांच्या मेळाव्याला आज संबोधित करणार आहेत. तुम्ही प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम घरबसल्या या लिंकवरून पाहू शकणार आहात.