महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Archana Patil BJP Entry : अर्चना पाटील चाकूरकर यांच्या भाजपा प्रवेशावर काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख काय म्हणाले? - Lok Sabha Elections - LOK SABHA ELECTIONS

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 31, 2024, 8:48 PM IST

लातूर Archana Patil BJP Entry : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांनी नुकताच भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. यावर काँग्रेसचे लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख हे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "अर्चना पाटील चाकूरकर यांचा भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय वैयक्तिक आहे. त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाला शुभेच्छा आहेत. त्यांनी एक वाट निवडलेली असून त्यांची ही पहिलीच राजकीय एन्ट्री आहे. ज्या पद्धतीचा विचार त्यांनी स्वीकारला आहे तसे ते काम करतील. येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणाचा किती जिल्ह्यात प्रभाव आहे ते पुढे बघू."

कॉंग्रेसकडून जातीपातीचं राजकारण नाही : जनता त्रस्त आहे की, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांना हमीभाव पाहिजे, मुलांना नोकऱ्या पाहिजे. या मुद्द्यांना घेऊन आम्ही आगामी निवडणुका लढवत आहोत. त्यामुळे जातीचा फॅक्टर आहे किंवा नाही आणि काँग्रेसने कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, अशी प्रतिक्रिया आमदार धीरज देशमुख यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details