पवार कुटुंबीयांचा बारामतीत वेगवेगळा पाडवा; कार्यकर्ते म्हणाले,"सगळंच वेगळं झाल्यामुळं..." - DIWALI PADWA
Published : Nov 2, 2024, 2:48 PM IST
पुणे : बारामतीत यंदा परंपरेनुसार दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. परंतु, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यामुळं दोन वेगवेगळ्या ठिकाणी पवार कुटुंबीय दिवाळी पाडवा साजरा करत असल्याचं बघायला मिळतय. काटेवाडीत अजित पवारांचा तर गोविंदबागेत शरद पवारांचा पाडवा उत्सव सुरू आहे. दोन्हीकडं कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करत आहेत. काटेवाडीत अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत आहेत. यावेळी इथं जमलेल्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या दिवाळी पाडव्या संदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "आता आपण काय करु शकतो. ते दोघं वेगवेगळे झाले म्हणून पाडवाही दोन ठिकाणी होत आहे."