महाराष्ट्र

maharashtra

देवेंद्र फडणवीस -अजित पवारांचं हेलिकॉप्टर भरकटलं : अजित पवारांनी सांगितला थरारक अनुभव - Devendra Fadnavis

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 17, 2024, 7:25 PM IST

देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उदय सामंत (ETV BHARAT MH Desk)

गडचिरोली Ajit Pawar :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह उद्योग मंत्री उदय सामंत गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांचं हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना घडली आहे. हेलिकॉप्टर भरकटल्यामुळं नेत्यांच्या काळजाचा ठेकाच चुकला. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेलिकॉप्टरमध्ये घडलेल्या घटनेचं वर्णन केलं. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यामध्ये दहा हजार कोटींच्या स्टील प्लांटची निर्मिती केली जाणार आहे. आज स्टील प्लांटच्या कामाचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत झालं. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री धर्मरावबाबा अत्राम देखील उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उदय सामंत हे नागपूरवरून  एकाच हेलिकॉप्टरमधून गडचिरोलीला गेले, त्यावेळी ही घटना घडली. अजित पवार म्हणाले "गडचिरोलीत भूमिपूजनासाठी येत असताना खराब हवामानामुळं हेलिकॉप्टरमधून सगळीकडं ढग दिसत होतं. त्यामुळं काळजी वाटू लागली. मात्र, देवेंद्र फडणवीस अतिशय शांत बसले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस उत्तर देताना म्हणाले, मी सहावेळा अपघातातून वाचलो आहे. आपण सुखरूप जाऊ, त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. 

ABOUT THE AUTHOR

...view details