अजित पवारांची ग्रामस्थांसह कर्यकर्त्यांसोबत 'चाय पे' चर्चा, पहा व्हिडिओ - AJIT PAWAR NEWS
Published : Nov 11, 2024, 1:53 PM IST
पुणे:- राज्याचं नव्हं तर संपूर्ण देशाचं बारामती विधानसभा निवडणुकीतील काका विरुद्ध पुतणे या लढतीकडं लक्ष लागलेलं आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे अजित पवार तर दुसरीकडे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षानं युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. बारामतीत काका विरुद्ध पुतणे अशी अटीतटीची लढत होत आहे. दोन्ही पवारांकडून बारामती विधानसभा मतदारसंघात प्रचार करत सभा घेत आपली भूमिका मांडण्यात येत आहे. अशातच आज बारामती विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. बारामती येथील वाणेवाडी येथे आयोजित संवाद सभेनंतर सोमेश्वर कारखाना परिसरातील हॉटेल सोमेश्वर रेस्टॉरंट येथे अजित पवार थांबले. त्यांनी यावेळी ग्रामस्थांसोबत बसून चहाचा आस्वाद घेतला. यावेळी अजित पवारांनी उपस्थित ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांसोबत 'चाय पे' चर्चा केल्याचं पहायला मिळालं.