आपल्या देशात दररोज 'एप्रिल फुल डे' साजरा होत आहे - आदित्य ठाकरे - Aditya Thackeray criticizes BJP - ADITYA THACKERAY CRITICIZES BJP
Published : Apr 4, 2024, 7:13 PM IST
बुलडाणा Buldana Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता आदित्य ठाकरे बुलढाण्यात आले होते. त्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. आपल्या देशामध्ये दररोज 'एप्रिल फुल डे' साजरा करण्यात येत आहे. तसंच भाजपाच्या अमरावतीतील उमेदवार नवनीत राणा यांच्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मी काही जणांना उत्तर देत नाही, असं त्यांनी प्रत्यूत्तर दिलं. प्रतिक्रिया देत असताना अचानक ट्रॅफिकला अडचण निर्माण होत असल्यानं त्याचीही जाणीव त्यांनी करून दिली हे विशेष. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांनी 2 एप्रिल रोजी यवतमाळ-वाशिम मतदासंघात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. बहुत हुए खोके-धोखे, अब घर बैठे रोके, अशी टीका त्यांनी महायुतीवर केलीय.