महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

अभिनेता सलमान खाननं बजावला मतदानाचा हक्क; नदीम खान आणि सलमान खानची मतदान केंद्रावर झाली भेट - Lok Sabha Elections 2024 - LOK SABHA ELECTIONS 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 9:02 PM IST

मुंबई Lok Sabha Elections 2024 : बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) ज्याला बिश्नोई गॅंगपासून जीवाला धोका आहे. 'वाय प्लस' सिक्युरिटी मध्ये देखील सलमान खान हा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आला होता. त्यावेळी सलमान खानच्या चाहत्यांनी देखील मोठी गर्दी केली होती. दरम्यान बॉलीवूड मधील प्रसिद्ध अशा डीओपी असलेल्या नदीम खान (Nadeem Khan) यांचा कपाळावर मुका घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच जमलेल्या काही चाहत्यांबरोबर सेल्फी सुद्धा सलमान खानने क्लिक केला आहे.

नदीम खान आणि सलमान खानची भेट : नदीम खान  यांनी 40 हून अधिक चित्रपटांसाठी काम केलं आहे. काही वर्षांपूर्वी शिड्यांवरुन पडल्यामुळं नदीम खान यांची ब्रेन सर्जरी झाली. तरीही त्यांची पत्नी पार्वती खान या त्यांना घेऊन मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहचल्या होत्या. 

ABOUT THE AUTHOR

...view details