हैदराबाद Zomato order scheduling feature: ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटोनं ग्राहकांसाठी एक खास फीचर लाँच केलं आहे. या नवीन फीचरमुळं ग्राहक दोन दिवस अगोदर त्यांच्या जेवणाची ऑर्डर शेड्यूल करू शकणार आहेत. याचा अर्थ आता Zomato च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या सोयीनुसार खाद्यपदार्थ आगाऊ बुक करू शकता. आता Zomato नं 30 मोठ्या शहरांमध्ये ही सुविधा सुरू केली आहे. या सेवेचा लाभ तुम्हाला दिल्ली NCR, बेंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, चंदीगड, पुणे, रायपूर, लखनऊ आणि जयपूर येथे या शहरात घेता येईल. ही सुविधा विविध शहरांमधील सुमारे 35,000+ रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध असेल.
कसं काम करणार फिचर? :Zomato वर ऑर्डर शेड्युलिंगसह, तुम्ही तुमचं जेवण आगाऊ करू शकता. त्यामुळं तुमची ऑर्डर तुम्हाला वेळेवर पोहचेल. तुमची ऑर्डर याप्रमाणे जेवणाचं शेड्यूल करू शकता. यामुळं तुमचा वेळ देखील वाचणार आहे. तसंच तुम्हाला वेळेवर पार्सल मिळेल, असा कंपनीचा दावा आहे.
- 1. आता तुमची ऑर्डर तुम्ही तुमच्या पसंतीच्या वेळी शेड्यूल करू शकता.
- 2. या फिचरमुळं तुम्हाला काही दिवस आगोदरच जेवणाचं बुकिंग करता येणार आहे.
- 3. जेवण बुक करताना तुम्हाला टाइम स्लॉटची निवडण्यास सांगितलं जाईल. त्यानुसार तुम्ही तुमची वेळी निवडा. जणेकरून तुमचं जेवण वेळेवर पोहचेल.
- 4. यामुळं कंपनीला तुमच्या बुकिंगची आगोदच माहिती असेल. त्यासाठी कंपनीला देखील जेवण तयार करण्यासाठी वेळ मिळेल. तसंच ग्राहकांना वेळेवर जेवण पोहचवता येईल.