हैदराबाद Xiaomi 15 and Xiaomi 15 Pro launch :आगामी Xiaomi 15 सीरीज 29 ऑक्टोबर रोजी चीनमध्ये लॉंच होणार आहे. कंपनीनं लॉंच अधिकृत तारीख जाहीर केली आहे. Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Pro हे दोन स्मार्टफोन या फ्लॅगशिप सीरिजमध्ये समाविष्ट लॉंच केले जातील. यामध्ये Xiaomi 15 Ultra या हाय-एंड व्हेरिएंटचा समावेश आहे. या दोघांपैकी फक्त Xiaomi 15 भारतात लॉंच होईल. गेल्या वर्षी प्रमाणे Xiaomi 14 Pro बाजारात उपलब्ध होणार आहे.
Xiaomi 15 ची अपेक्षित किंमत : Xiaomi 15 मालिका त्याच्या पूर्ववर्ती Xiaomi 14 मालिकेपेक्षा जास्त किंमतीत येईल. मागील आवृत्तीच्या तुलनेत नवीन मॉडेलची किंमत 5 हजार ते 10 हजार रुपयांनी वाढू शकते. भारतात Xiaomi 14 मालिकेची सुरुवातीची किंमत 69 हजार 999 रुपये आहे. Xiaomi 15 भारतात 75 हजार ते 80 हजार रुपयांच्या दरम्यान लॉंच केला जाऊ शकतो. Xiaomi 15 सीरीज पुढील वर्षी मार्चमध्ये लॉंच केला जाऊ शकतो. Xiaomi 15 मालिकेत Xiaomi 15, Xiaomi 15 Ultra यांचा समावेश आहे.
Xiaomi 15 चे स्पेसिफिकेशन्स : Xiaomi 15 स्मार्टफोन सिरीजमध्ये Xiaomi 14 आणि 13 सारखे कॉम्पॅक्ट फीचर्स असतील. गेल्या वर्षीच्या Xiaomi 14 मालिकेमध्ये चौरस कॅमेरा मॉड्यूल, फ्लॅट डिस्प्ले, स्लीम आणि एकसमान बेझल्स होते. Xiaomi 15 मालिका 6.36 इंच फ्लॅट AMOLED डिस्प्लेसह येते, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.