हैदराबाद : Oppo Find N5 लवकरच लॉंच होणार आहे. हा फोन पांढऱ्या रंगासह प्रकारात येईल. काही अहवालांनुसार हा फोन काळ्या रंगाच्या पर्यायात देखील सादर केला जाऊ शकतो. याशिवाय, या फोल्डेबल फोनसोबत Oppo Watch X2 देखील लाँच केला जाईल. कंपनीच्या उत्पादन व्यवस्थापकांनी आणखी एका पोस्टद्वारेमध्ये Find N5 दोन आठवड्यात लाँच केला जाणार असल्याचं म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून Oppo स्लिम डिझाइनसह येणाऱ्या फोल्डेबल फोनची टीज करत आहे. Find N5 हा आतापर्यंतचा सर्वात पातळ फोन असेल अशी चर्चा आहे.
Find N5 चा टीज जारी
Weibo वरील Zhou Yibao च्या नवीनतम पोस्टमध्ये म्हटलं की Oppo Find N5 पुढील दोन आठवड्यात चीनमध्ये लाँच केला जाईल, याचा अर्थ असा की हा फोन 19 किंवा 20 फेब्रुवारीच्या आसपास लाँच होऊ शकतो. तथापि, त्याची अचूक लाँच तारीख येत्या काही दिवसांत उघड होण्याची अपेक्षा आहे. Oppo नं दुसऱ्या पोस्टमध्ये Find N5 च्या पातळ डिझाइनची टीज जारी केलाय. यावरून असं दिसून येते की फाइंड Find N5 फाइंड एन3 पेक्षा पातळ असेल.
फोल्डेबल फोन 4.4 मिमी पेक्षा पातळ असेल
ओप्पो एन3 ची जाडी उघडल्यावर 5.8 मिमी आहे. कंपनीनं यापूर्वी पुष्टी केली आहे की लाँचच्या वेळी हा जगातील सर्वात पातळ फोल्डेबल फोन असेल, सध्या ऑनर मॅजिक व्ही3 सर्वात पातळ फोन आहे, जो उघडल्यावर 4.4 मिमी आणि फोल्ड केल्यावर 9.4 मिमी आहे. अशा परिस्थितीत, येणारा ओप्पो फोल्डेबल फोन 4.4 मिमी पेक्षा पातळ असेल.