महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

ChatGPT सह AI जगाला हादरवून टाकणारे चिनी AI मॉडेल, DeepSeek काय आहे? - WHAT IS DEEPSEEK

चिनी टेक स्टार्टअप डीपसीकनं तयार केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता चॅटबॉटमुळं सोमवारी शेअर बाजारांमध्ये मोठा गोंधळ उडालाय. या चॅटबॉटमुळं अमेरिका आणि चीनमध्ये वादविवाद सुरू झालाय.

DeepSeek
DeepSeek (AFP)

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 28, 2025, 12:58 PM IST

हैदराबाद : सोमवारी डीपसीक एआय असिस्टंट हे ॲपलच्या आयफोन स्टोअरवर सर्वाधिक डाउनलोड केलेलं ॲप बनलंय. काही अमेरिकन तंत्रज्ञान उद्योग निरीक्षकांना याबाबत चिंता व्यक्त केलीय. चिनी स्टार्टअप्सनं जनरेटिव्ह एआयमध्ये खूपच कमी खर्चात एआय विकसीत केलंय. या एआयमुळं अमेरिकन कंपन्यांना मोठा फटका बसलाय. अमेरिकन टेक कंपन्या एआयला आणखी प्रगत करण्यासाठी आवश्यक असलेल्या डेटा सेंटर्स आणि संगणक चिप्सवर किती पैसे खर्च करतात याबद्दल प्रश्न उपस्थित होता. परंतु डीपसीकच्या तांत्रिक कौशल्याबद्दलच्या प्रचार आणि गैरसमजांमुळंही गोंधळ निर्माण झालाय. "चीननं बनवलेलं डीपसीकचं एआय मॉडेल्स नेत्रदीपक असून, ते चमत्कार नाही," असं बर्नस्टाईन विश्लेषक स्टेसी रासगन यांनी म्हटलंय.

काय आहे डीपसीक?
स्टार्टअप डीपसीकची स्थापना 2023 मध्ये चीनमधील हांगझोऊ येथे झाली होती. त्याच वर्षी त्यांनी त्यांचं पहिले एआय लार्ज लँग्वेज मॉडेल लाँच केलं होतं. त्याचे सीईओ लियांग वेनफेंग यांनी यापूर्वी चीनमध्ये एक हाय-फ्लायरची सह-स्थापना केली होती, जे एआय-चालित क्वांटिटेटिव्ह ट्रेडिंगवर लक्ष केंद्रीत करत होतं. 2022 पर्यंत त्यांनी कॅलिफोर्निया-आधारित एनव्हीडियाच्या १०,००० उच्च-कार्यक्षमता असलेल्या A100 ग्राफिक्स प्रोसेसर चिप्सचा एक समूह जमा केला होता, असा दावा चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीचॅटवर दावा केलाय. त्यानंतर अमेरिकेनं त्या चिप्सची विक्री प्रतिबंधित केली होती.

डीपसीककडं एआय उद्योगाचं लक्ष
डीपसीकनं म्हटले आहे की, त्यांचं अलीकडील मॉडेल एनव्हीडियाच्या कमी-कार्यक्षमता असलेल्या AH800 चिप्ससह तयार केलं गेलं आहे, ज्यावर चीनमध्ये बंदी नाही. गेल्या महिन्यात डीपसीकनं एआय उद्योगाचं अधिक लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांनी एक नवीन एआय मॉडेल लाँच करत चॅटजीपीटी सारख्या अमेरिकन कंपन्यांच्या समान मॉडेल्सच्या बरोबरीचे होते आणि डेटाच्या खजिन्यावर सिस्टमला प्रशिक्षित करण्यासाठी महागड्या एनव्हीडिया चिप्स वापरण्यात ते अधिक किफायतशीर होते. या वर्षाच्या सुरुवातीला अ‍ॅपल आणि गुगल अ‍ॅप स्टोअर्सवर दिसल्यानंतर चॅटबॉट अधिक व्यापकपणे उपलब्ध झाला.

डीपसीकनं टाकलं चाटजीपीटीला मागं
चिनी एआय स्टार्टअप डीपसीक जागतिक स्तरावर एआयच्या जगात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या शर्यतीत ही एक मोठी कामगिरी मानली जाते. रिलीज झाल्यानंतर काही आठवड्यांतच, अमेरिकेतील अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरील डाउनलोडच्या बाबतीत त्यांनी चॅटजीपीटीला मागं टाकलंय. चीनमधील एआय स्टार्टअप डीपसीक हे अमेरिकेतील अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरील सर्वाधिक रेटिंग असलेले मोफत अ‍ॅप बनलं आहे. डीपसीक पूर्व चीनी शहर हांगझोऊ येथील एका स्टार्टअपनं विकसित केलं आहे. हे स्टार्टअप त्याच्या अद्वितीय नवोपक्रमासाठी ओळखलं जातं.

अ‍ॅप स्टोअरवर चॅटजीपीटीच्या पुढं
अ‍ॅप डेटा रिसर्च फर्म सेन्सर टॉवरच्या मते, 10 जानेवारी रोजी रिलीज झाल्यापासून डीपसीक-व्ही३ पॉवर्ड एआय असिस्टंट मॉडेलला बरीच लोकप्रियता मिळाली आहे. डीपसीक डेव्हलपर्सचा दावा आहे की, डीपसीक-व्ही३ मॉडेल अनेक ओपन-सोर्स मॉडेल्सपेक्षा चांगलं काम करतंय. हे एआय जागतिक स्तरावर क्लोज-सोर्स मॉडेल्सशी स्पर्धा करते. या चॅटबॉटनं अमेरिकेतील ॲपल ॲप स्टोअरवर चॅटजीपीटीला मागे टाकण्यात यश मिळवलं आहे.

अमेरिकेला आव्हान
ही चिनी एआय स्टार्टअप जागतिक स्तरावर एआयच्या जगात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या शर्यतीत ही एक मोठी कामगिरी मानली जाते. एआयच्या बाबतीत हे स्टार्टअप अमेरिकेला आव्हान देतंय. अमेरिकेत बनवलेल्या चिप्सना माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चीनपर्यंत पोहोचू दिलं नव्हतं. परंतु त्यानंतरही, हे स्टार्टअप 2021 मध्ये सुरू झालं होतं. चीन एआय आपली पकड मजबूत करण्यासाठी काम करत आहे. डीपसीकच्या संशोधकांनी डीपसीक-व्ही३ मॉडेलला एनव्हीडियाच्या एच800 चिप्स वापरून प्रशिक्षित करण्यात आलं होतं, ज्याचा प्रशिक्षण खर्च 6 डॉलर दशलक्षपेक्षा कमी होता.

हे वाचलंत का :

  1. टिकटॉक खरेदी करण्यासाठी मायक्रोसॉफ्टची चर्चा सुरू, इतर कंपन्यांनी बोली लावण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा
  2. UPI वापरकर्त्यांनो सावधान! 'हा' पर्याय ताबडतोब करा बंद, अन्यथा तुमचं खातं होणार रिकामं
  3. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : PM Kisan च्या 19 वा हप्त्याची रक्कम 'या' दिवशी होणार जामा

ABOUT THE AUTHOR

...view details