हैदराबाद :जर्मन कार उत्पादक फोक्सवॅगनची नवीन एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कार लवकरच लाँच होणार आहे. ही ई-कार 2027 मध्ये लॉंच होण्याची शक्यता आहे. या कारबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया या बातमीतून...
उच्च दर्जाची असणार कार
जर्मन कार उत्पादक फोक्सवॅगन त्यांची नवीन एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची तयारी करत आहे, ज्याची किंमत सुमारे 18.15 लाख रुपये असेल. या कारचं कॉन्सेप्ट मॉडेल मार्च 2025 मध्ये लोकांसमोर सादर केलं जाईल. त्यानंतर कारचं उत्पादन होणार असून ही कार 2027 मध्ये जागतिक बाजारात लाँच केली जाईल. फोक्सवॅगनचे सीईओ थॉमस शेफर यांनी कंपनीसाठी ही नवीन कार एक महत्त्वाचा क्षण असल्याचं म्हटलं आहे. "युरोपमधील एक परवडणारी, उच्च दर्जाची आणि फायदेशीर इलेक्ट्रिक फोक्सवॅगन ही कार असेल, असं त्यांनी या गाडीचं वर्णन केलंय.
कमी किमतीत शक्तिशाली ईव्ही
फोक्सवॅगनची ही नवीन इलेक्ट्रिक कार बजेट-फ्रेंडली आणि पर्यावरणपूरक गतिशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केलेली आहे. ही ईव्ही परवडणारी किंमत, टिकाऊ आणि प्रगत इलेक्ट्रिक कारच्या शोधत असलेल्या ग्राहकांना आकर्षित करेल.