हैदराबाद :Vivo स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Vivo लवकरच आपल्या चाहत्यांसाठी Vivo X200 मालिका भारतासह जागतिक बाजारपेठेत लॉंच करणार आहे. कंपनीनं ही स्मार्टफोन सीरिज आपल्या होम मार्केटमध्ये गेल्या महिन्यात लॉंच केली होती. कंपनीनं या सीरिजमध्ये तीन स्मार्टफोन सादर केले होते. ही मालिका आधीच चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. काही दिवसातचं ही मालिका भारतातही लॉंच होणारआहे. या मालिकेत Vivo X200, X200 Pro, आणि X200 Mini लॉंच होण्याची शक्यता आहे.
Vivo चे तीन स्मार्टफोन लॉंच :कंपनीनं आपल्या होम मार्केटमध्ये Vivo X200 सीरीजचे तीन प्रकार लॉंच केले आहेत. पण, मलेशियाने सादर केलेल्या टीझरमध्ये दोनच प्रकार समोर आले आहे. यात Vivo X200 आणि Vivo X200 Pro ची झलक पहायला मिळतेय. त्यामुळं कंपनी भारतीय स्मार्टफोन बाजारात या मालिकेतील तिन्ही मॉडेल्स लॉंच करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Vivo X200 मालिका काही दिवसांपूर्वी चीनमध्ये लॉंच करण्यात आली होती. कंपनी या मालिकेतील तीन मॉडेल्स लॉंच करण्याचा विचार करत आहे. डिसेंबरच्या अखेरीस ही मालिका भारतात लॉंच होण्याची शक्यता आहे. यात मोठी बॅटरी आणि पॉवरफुल प्रोसेसर अशी वैशिष्ट्ये असतील.
डिस्प्ले आणि प्रोसेसर :Vivo X200 मालिकेत X200, X200 Pro आणि X200 Pro Mini, X200 आणि X200 Pro मध्ये उत्कृष्ट OLED डिस्प्ले आहेत, X200 मध्ये 6.67-इंच स्क्रीन आहे आणि X200 Pro मध्ये 6.78 इंचांची स्क्रीन आहे. दोन्ही फोनचा डिस्प्ले 120Hz ESH दर आणि 1.5K रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. डिस्प्ले 4500 nits च्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.