हैदराबाद Tips for traveling on long drive : तुम्ही तुमच्या कारमध्ये तुमच्या कुटुंबासोबत लांबच्या प्रवासाला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही कुटुंबासोबत फिरायला जाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?. त्याचबरोबर सहलीला जाण्यापूर्वी गाडीशी संबंधित कोणत्या गोष्टी कराव्यात?. कारमध्ये काय ठेवावं? चला जाणून घेऊया प्रवासाला जाण्यापूर्वी कोणत्या 5 गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
कार सर्व्हिस करा :प्रावासाला जाताना थोडासा निष्काळजीपणा प्रवासाची मजा खराब करू शकतो. तुम्ही तुमच्या कारमध्ये सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर बाहेर जाण्यापूर्वी नक्कीच त्याची सर्व्हिस करून घ्या. यामुळं कारमधील दोष लक्षात येतात. अन्यथा, प्रवासादरम्यान कोणतीही गडबड झाल्यास तुम्हाला महागात पडू शकतं. याशिवाय वाहनाचं ब्रेक, ऑइल, वायपर, एसी, कूलंट योग्य प्रकारे काम करत आहेत, हेही तपासून घ्या.
गाडीची मूळ कागदपत्रे सोबत ठेवा : प्रवासाला जाताना वाहनाची मूळ कागदपत्रे सोबत ठेवावीत. अलीकडच्या काळात, जवळजवळ प्रत्येकजण त्यांच्या फोनमध्ये वाहनांची कागदपत्रे जतन करून ठेवतो. प्रवासात तुमचा फोन डिस्चार्ज झाला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळं लांबच्या प्रवासाला जाताना वाहनाची मूळ कागदपत्रं नेहमी सोबत ठेवा.