हैदराबाद Tata Curvv 5 star safety rating :टाटा मोटर्सनं या वर्षीच आपली SUV कूप Tata Curvv भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली होती. आता या कारची क्रॅश चाचणी भारत NCAP द्वारे करण्यात आली. ज्यामध्ये Tata Curvv coupe SUV नं 5-स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त केलं आहे.
इतके मिळाले गुण : कारनं सुरक्षा चाचणीत प्रौढ नागरिकांच्या संरक्षणासाठी 29.50/32 आणि लहान मुलांच्या संरक्षणासाठी 43.66/49 असे गुण मिळवले आहे. चाचणी केलेल्या पॉवरट्रेन क्रॅशमध्ये डिझेल एमटी, पेट्रोल डीसीटी आणि पेट्रोल एमटीचा समावेश आहे. चाचण्यांमध्ये, डोकं, मान शरीराच्या खालच्या भागासाठी चांगलं गुण मिळले आहे. या कारचा फ्रंटल ऑफसेट डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टसाठी एकूण स्कोअर 14.65/16 आणि साइड मूव्हेबल डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टसाठी 14.85/16 होता. मुलांच्या बाबतीत, स्कोअर CRS स्कोअरसाठी 12/12 आणि वाहन मूल्यमापन स्कोअरसाठी 9/13 होता.
Tata Curvv मध्ये उपलब्ध सुरक्षा वैशिष्ट्ये : या कारच्या सर्व प्रकारांमध्ये सहा एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट माउंटिंग पॉइंट, ESC, सीटबेल्ट रिमाइंडर आणि पादचारी संरक्षण मानक आहे. 7 ऑगस्ट 2024 रोजी भारतात लॉन्च झालेली Tata Curvv भारतात Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Grand Vitara आणि Toyota Hyder सारख्या कारशी स्पर्धा करते.