बेंगळुरूSCIENCE CITY OF BANGALORE :19 व्या शतकात शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी वापरलेल्या दुर्मिळ सामग्रीचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. 'SCI560' 'सायन्स सिटी ऑफ बेंगळुरू सायंटिफिक हिस्ट्री' असं या प्रदर्शनाचं नावं आहे. युवकांना विज्ञान संशोधनात रुची निर्माण करण्यासाठी राज्य सरकारसह आंतरराष्ट्रीय विज्ञान गॅलरी नेटवर्कनं हेब्बल येथे "बेंगळुरू सायन्स गॅलरीचं आयोजन केलं आहे.
प्रदर्शनात सर्वसमावेशक माहिती : SCI560 या प्रदर्शनात 19व्या शतकापासून ते आजपर्यंतच्या औद्योगिक, लष्करी आणि वैज्ञानिक संशोधन केंद्रांमध्ये बंगळुरूच्या वैज्ञानिक योगदानाचं सर्वसमावेशक माहिती असेल. त्यामुळं तरुण विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रातील संशोधनाचा अभ्यास करता येणार आहे. पहिल्या महायुद्धात भारतीयांनी वापरलेला टॉर्पेडो (लोखंडी भाला) या प्रदर्शनात लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. याला बेंगळुरूमध्ये डिझाइन केलंय. तत्कालीन मद्रास इंजिनियर ग्रुपनं टॉर्पेडोची निर्मिती केली होती. पहिल्या महायुद्धात शत्रूविरुद्ध लढण्यासाठी सैनिकांनी याचा वापर केल्याची माहिती आयोजकांनी दिलीय.
मुन्सेल रिश्टर आकर्षण : या प्रयोगात 2019 मध्ये विविध तलावातील माती गोळा करण्यात आली. त्यात दहा वेगवेगळ्या ठिकाणी पाणी आणि बॅक्टेरिया वाढल्याचं दिसून आलं. आता सूक्ष्मजीव पुनरुत्पादन करत आहेत आणि मातीवर अवलंबून विविध आकर्षक रंग निर्माण करत आहेत.
सीव्ही रमण तबला :भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रामन यांनी वाद्यांच्या कंपनांचा अभ्यास करताना संशोधनासाठी वापरलेला तबला या प्रदर्शनात आहे. ध्वनीच्या अभ्यास करणाऱ्यांना वाद्याची कंपनं आणि आवाज अनुभवण्याची संधी यातून मिळतेय.