हैदराबाद : सॅमसंग त्यांच्या स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये मोठे अपग्रेड देण्याची तयारी करत आहे. दक्षिण कोरियाच्या FNNews नुसार, सॅमसंग त्यांच्या आगामी फ्लॅगशिप डिव्हाइस Galaxy S26 Ultra मध्ये 7000mAh बॅटरी देऊ शकते. गेल्या महिन्यात लीक झालेल्या अहवालात म्हटलं आहे, की सॅमसंग Sci/C बॅटरी तंत्रज्ञानावर काम करत आहे. फ्लॅगशिप प्रोसेसरच्या वीज गरजा पूर्ण करण्यासाठी चीनमधील अनेक आघाडीच्या स्मार्टफोन उत्पादक कंपन्या आधीच सिलिकॉन-कार्बन बॅटरीकडं वळल्या आहेत. आता सॅमसंग देखील यामध्ये सामील होऊ शकते.
स्मार्टफोन बाजारात जोरदार स्पर्धा
स्मार्टफोन बाजारात जोरदार स्पर्धा सुरू आहे. काही कंपन्या सॅमसंगच्या आधी 7000mAh पेक्षा जास्त बॅटरी असलेले फोन आधीच देत आहेत. नुबिया रेड मॅजिक 10 प्रो स्मार्टफोनमध्ये 7050 एमएएच बॅटरी आहे. मिड-रेंज सेगमेंटमधील रेडमी टर्बो 4 प्रोमध्ये 7500 एमएएच बॅटरी असू शकते. बॅटरी व्यवस्थापनासाठी सॅमसंग वनयूआय 7 मध्ये उत्तम बॅटरी ऑप्टिमायझेशन देत आहे. कंपनीचे नवीनतम फ्लॅगशिप फोन 13 तास 17 मिनिटांपर्यंत बॅटरी लाइफ देत आहेत.