हैदराबाद :भारतातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड, सॅमसंगनं Galaxy M05 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन कंपनीच्या लोकप्रिय Galaxy M मालिकेतील आवृत्ती आहे. यात उत्कृष्ट कॅमेरा असून परवडणाऱ्या किंमतीत हा फोन तुम्ही खरेदी करु शकता.
“Galaxy M05 हे तरुण ग्राहकांसाठी डिझाइन केलेला फोन आहे. यात 50MP ड्युअल कॅमेरा, 25W जलद चार्जिंगसह दीर्घकाळ टिकणारी 5000mAh बॅटरी आहे. या फोनमध्ये जबरदस्त 6.7″ HD+ डिस्प्ले या असून उत्तम कॅमेरा आहे. या उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह, Galaxy M05 एंट्री-लेव्हल स्मार्टफोन्समध्ये एक नवीन बेंचमार्क सेट करण्यासाठी सज्ज आहे.”- MX बिझनेस हेड राहुल पाहवा, सॅमसंग इंडिया
उत्तम कॅमेरा : Galaxy M05 स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. त्यामुळं अधिक चागंले फोटो काढता येतात. यात एपर्चर F/1.8 सह उच्च-रिझोल्यूशन 50MP वाइड-एंगल लेन्स कमी प्रकाशातही आकर्षक प्रतिमा कॅप्चर करतो. तर 2MP डेप्थ-सेन्सिंग कॅमेरा स्पष्ट प्रतिमा कॅप्चर करतो. 8MP फ्रंट कॅमेरा तुमचे सेल्फी उत्तम प्रकारे कॅच करतो.
दीर्घकाळ टिकणारी बॅटरी :Galaxy M05 मध्ये 5000 mAh बॅटरी आहे. जी फोनला दीर्घकाळ काम करण्यास मदत करते. तुम्ही स्ट्रीमिंग करत असाल, गेमिंग करत असाल किंवा बिन्ज-वॉचिंग करत असाल, 25W फास्ट चार्जिंग वैशिष्ट्य तुम्हाला तुमचा स्मार्टफोन नेहमी चालू ठेवण्यास मदत करेल.