हैदराबाद : सॅमसंगनं फोल्डेबल फोन सेगमेंटवर आधीपासूनच वर्चस्व गाजवलं आहे. आता ब्रँड पुन्हा एकदा फोल्डेबल फोन सेगमेंटमध्ये नविन फोन लॉंच करण्यासाठी तयार आहे. टेक्नॉलॉ़जी विश्लेषक रॉस यंग यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, सॅमसंग 2026 च्या सुरुवातीला आपला बहुप्रतिक्षित Galaxy Tri Fold स्मार्टफोन लॉनं करणार आहे. या डिव्हाइसमध्ये तीन स्क्रीन असतील, असा त्यांनी दावा केलाय. Samsung चे Galaxy Z Fold आणि Galaxy Z Flip सीरीजचे स्मार्टफोन जगभरात आधीच खूप लोकप्रिय आहेत, त्यामुळे ट्राय-फोल्ड फोन आणणं कंपनीसाठी एक महत्त्वाचं पाऊल असू शकतं.
सॅमसंगचा ट्राय फोल्ड फोन कधी होईल लॉंच : टेक्नॉलॉजी विश्लेषक रॉस यंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अलीकडील पोस्टमध्ये फोनची टाइमलाइन उघड केली. त्यानं सांगितलं की ट्रिपल-फोल्डिंग डिव्हाइस Samsung च्या आगामी Galaxy Z Fold 7 आणि Galaxy Z Flip 7 नंतर लवकरच लॉंच होण्याची अपेक्षा आहे.