हैदराबाद : Samsung अनेक नवीन अपग्रेड्ससह Galaxy S25 मालिका सादर करण्याची तयारी करत आहे. Samsung पुढील वर्षी त्यांचा पुढील Galaxy S मालिकेचा फोन, Galaxy S25 मालिका लाँच करण्याची तयारी करत आहे. याबाबत अभिषेक यादव यांनी X वर पोस्ट करत, कंपनी 22 जानेवारी 2025 रोजी Samsung Galaxy S25 मालिका लॉंच करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, Samsung कंपनीकडून आद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीय. या सीरीजमध्ये कंपनी चार फोन लाँच करू शकते, ज्यामध्ये व्हॅनिला Galaxy S25+, Galaxy S25 Ultra आणि एक पूर्णपणे नवीन Galaxy S25 स्लिम प्रकार समाविष्ट आहे.
Samsung Galaxy S25 Ultra कधी होणार लाँच?: सॅमसंगनं अद्याप Samsung Galaxy S25 Ultra च्या लाँचची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, परंतु संभाव्य लाँच तारखेबद्दल अफवा पसरल्या आहेत. अभिषेक यादव यांनी केलेल्या पोस्टनुसार कंपनी 22 जानेवारी रोजी एका कार्यक्रमात भारत आणि इतर बाजारपेठांमध्ये नवीन Galaxy S25 Ultra लाँच करू शकते, असं म्हटलं आहे.
Samsung Galaxy S25 Ultra ची किंमत (अपेक्षित) : सॅमसंग गॅलेक्सी S24 Ultra या वर्षी जानेवारीमध्ये भारतात 1,29,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह लाँच झाला. येणाऱ्या Samsung Galaxy S25 Ultra ची किंमतही सारखीच असण्याची शक्यता आहे. मात्र, फोनची नेमकी किंमत लॉंच कार्यक्रमात जाहीर झाल्यानंतरच कळेल.