हैदराबाद SAMSUNG GALAXY M05 LAUNCHED :सॅमसंगनं आपल्या M-Series चा नवीनतम एंट्री-लेव्हल स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. Samsung Galaxy M05 हा कंपनीचा नवीन फोन आहे. यात 4 GB RAM, 64 GB स्टोरेज तसंच 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देखील आहे. Samsung Galaxy M05 स्मार्टफोनमध्ये काय खास आहे? किंमत काय आहे? कोणते फिचर मिळणार आहेत, याबाबत माहिती जाणून घ्या...
Samsung Galaxy M05 ची भारतात किंमत :Samsung Galaxy M05 स्मार्टफोन भारतात 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंट 7 हजार 999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. फोन मिंट ग्रीन कलरमध्ये येतो. हा हँडसेट सॅमसंगच्या वेबसाइट, Amazon India आणि निवडक रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Samsung Galaxy M05 फिचर : Samsung Galaxy M05 स्मार्टफोनमध्ये 6.74 इंच HD+ (720×1,600 pixels) PLS LCD डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G85 प्रोसेसर आहे. डिव्हाइसमध्ये 4GB रॅम, 64GB इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येते. सॅमसंगच्या रॅम प्लस फिचरसह, रॅम 8GB पर्यंत वाढविली जाऊ शकते. फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो.