हैदराबाद :सॅमसंगनं Galaxy Book 5 Pro लॅपटॉप लॉंच केला आहे. Galaxy Book 5 मालिकेची ही नवीन आवृत्ती आहे. हा लॅपटॉप इंटेल कोअर अल्ट्रा सीरीज 2 प्रोसेसरनं सुसज्ज आहे. यात डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. 14 इंच आणि 16 इंच डिस्प्ले व्हेरियंटमध्ये हा लॅपटॉप लॉंच करण्यात आला आहे. ज्यामध्ये AI वैशिष्ट्ये देखील आहेत. यात एक समर्पित न्यूरल प्रोसेसिंग युनिट (NPU) आहे, जे प्रति सेकंद 47 ट्रिलियन ऑपरेशन्सना समर्थन देतं. कंपनीच्या म्हणण्यानुसार हा लॅपटॉप सुरुवातीला दक्षिण कोरियामध्ये उपलब्ध असेल. या लॅपटॉपची विक्री 2 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे.
विषेश सवलत :कंपनी सुरुवातीच्या सेलमध्ये डिस्काउंट कूपन देखील देत आहे, ज्यासाठी इच्छुक ग्राहक विक्रीसाठी नोटिफिकेशन पर्याय निवडू शकतात. लॅपटॉप ग्रे आणि सिल्व्हर रंगात उपलब्ध आहे. यात एआय सिलेक्ट फीचर आहे, जे गुगलच्या सर्कल टू सर्च प्रमाणं काम करतं. फोटो रीमास्टर नावाचं आणखी एक वैशिष्ट्य यात आहे, जे जुन्या प्रतिमांना हाय डेफिनेशन रिझोल्यूशनमध्ये रूपांतरित करू शकतं.