हैदराबाद : Redmi K80 सीरीजसोबत Xiaomi ब्रँडनं मिड-रेंज स्मार्टफोनसह, दोन इतर नवीन उत्पादनं देखील सादर केली. यात रेडमी वॉच 5 आणि रेडमी बड्स 6 प्रोचा समावेश आहे0. स्मार्टवॉच आणि वायरलेस बड दोन्ही आता चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत, परंतु येत्या काही महिन्यांत इतर देशांमध्ये लॉंच दोन्ही प्रोडक्ट लॉंच होण्याची अपेक्षा आहे. रेडमी वॉच 5 दोन काळा आणि चांदी रंगामध्ये उपलब्ध आहे.
लेदर मॅग्नेटिक स्ट्रॅप :वॉच 5 मध्ये 1,500 निट्स पीक ब्राइटनेस, 432 x 514 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह मोठा 2.07-इंच AMOLED वक्र डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये 82 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो आणि अतिशय पातळ 2mm बेझल्स आहे, असा Redmi चा दावा आहे. कोना लेदर मॅग्नेटिक स्ट्रॅपसह, स्मार्टवॉमध्ये सात स्ट्रीप पर्याय देखील मिळतील. ही वॉच HyperOS 2 द्वारे समर्थित आहे. त्यात स्मार्ट कार कार्यक्षमता आणि मल्टी-डिव्हाइस कनेक्टिव्हिटीसह NFC (नियर फील्ड कम्युनिकेशन) मिळेल. रेडमी वॉचमध्ये 5550 mAh बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी 24 दिवसांपर्यंत बॅटरी टीकते, परंतु स्मार्टवॉचची eSIM आवृत्ती केवळ 12 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप देते देते. eSIM मॉडेल स्टँडअलोन कॉल, संदेश, 25 तासांपर्यंत वॉकी-टॉकीची परवानगी देते.