हैदराबाद : Xiaomi या महिन्याच्या अखेरीस Redmi K80 मालिका स्मार्टफोन लॉंच करू शकते. दोन्ही फोनमध्ये मजबूत डिस्प्ले, हेवी रॅम आणि शक्तिशाली कॅमेरा सेन्सरसह असण्याची शक्यता आहे. फोनला फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी बॅटरी देखील मिळेल. एक नजर टाकूया आगामी स्मार्टफोन्समध्ये काय खास असेल...
Redmi K80 चे फीचर :बेस Redmi K80 मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर असेल. मागील बाजूस असलेल्या कॅमेरा सिस्टीममध्ये 50 मेगापिक्सलचा ओम्निव्हिजन OV50 मुख्य सेन्सर समाविष्ट असेल, ज्यामध्ये 8-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स असतील. समोरच्या सेल्फीसाठी, 20-मेगापिक्सेलचा OmniVision OV20B सेन्सर असण्याची अपेक्षा आहे.
6500mAh बॅटरी :बॅटरी लाइफबद्दल बोलायचं झालं तर, K80 ला 6500mAh बॅटरी पॅक असेल, जो 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येऊ शकते. सुरक्षेसाठी फोनला अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. फोनमध्ये प्रीमियम फीलसाठी मेटल मिडल फ्रेम, समोर आणि मागे ड्रॅगन क्रिस्टल ग्लास आणि धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 रेटिंग देखील आहे.
Redmi K80 Pro चे तपशील :प्रो व्हेरियंटमध्ये टॉप-ऑफ-द-लाइन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरद्वारे समर्थित असेल. फोनचा डिस्प्ले 2K Huaxing LTPS पॅनेल आहे, जो सपाट डिझाइनसह तयार केला आहे. प्रो वरील कॅमेरा सेटअप ५० मेगापिक्सेलचा असेल. यात मुख्य सेन्सर (OmniVision OV50) असून एक अतिशय उच्च-रिझोल्यूशन 32-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड ISOCELL KD1 सेन्सर असेल. तसंच 50-मेगापिक्सेल ISCOELL JN5 टेलीफोटोझोम 2.6x लेन्स असेल. सेल्फीसाठी मानक K80 सारखाच 20 मेगापिक्सेल सेन्सर असणार आहे. या फोनची बॅटरी 120W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग या दोन्हींच्या सपोर्ट करण्याची शक्यता आहे. फोनला अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर, मेटल मिडल फ्रेम, ड्रॅगन क्रिस्टल ग्लास बिल्ड आणि IP68 रेटिंग देखील मिळतंय.
हे वाचलंत का :
- Samsung Galaxy S25 Ultra चे फीचर झाले लिक, फोनमध्ये 200 MP कॅमेरा
- स्मार्टफोनच्या उत्पन्नात जोरदार वाढ; 4 वर्षात सरकार झालं मालामाल, महसूल 19 पटीनं वाढला
- माणसं पृथ्वीवर कलंक, गटारासारख्या माणसांनी आत्महत्या करावी, गुगल चॅटबॉटच्या उत्तरानं खळबळ