हैदराबाद : Redmi 14C 5G : जर तुम्ही स्वस्त फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही दिवस आणखी वाट पहावी लागणार आहे. Redmi 14C 5G जानेवारीमध्ये लॉंच होणार आहे. Redmi इंडियानं या स्मार्टफोनची टीझर जारी केला आहे. मात्र, लॉंच बाबत कंपनीकडून अधिकृत माहिती आलेली नाहीय.
Redmi 14C 5G :Xiaomi चा सब-ब्रँड Redmi लवकरच एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. Redmi नं अलीकडेच त्यांची Redmi Note 14 मालिका लाँच केलीय. आता कंपनी बजेट रेंजमध्ये एक नवीन डिव्हाइस आणत आहे. ब्रँडनं या डिव्हाइसची टीझर जारी केला आहे. हा फोन जानेवारी 2025 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. परंतु Redmi 14C 5G फोनच्या लॉंच तारखेबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एका टिपरनं दिलेल्या माहितीनुसार हा फोन चीनमध्ये लाँच केलेल्या Redmi 14R चं रिब्रँडेड व्हर्जन असेल. या फोनशी संबंधित खास गोष्टी जाणून घेऊया....
Redmi 14C 5G टीझर जारी :रेडमी इंडियानं त्यांचा आगामी 5G फोनचा टीझर जारी केला आहे. जर टीझरवर विश्वास ठेवला तर, हा फोन नवीन वर्षात म्हणजेच 2025 मध्ये लाँच केला जाईल. त्यामुळं आता कोणताही फोन लाँच करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कंपनीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्टर शेअर केला आहे, ज्यावर ग्लोबल डेब्यू लिहिलं आहे. म्हणजेच, हा फोन भारताव्यतिरिक्त इतर बाजारपेठांमध्ये लाँच केला जाईल. मात्र, कंपनीनं लाँचची तारीख आणि फोनचं नाव उघड केलेलं नाही. Redmi ने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये एक गोलाकार कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. त्याच्या डिझाइनमुळं, तो Redmi 14C असण्याचा अंदाज लावला जात आहे.