महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

PM KISAN 18 वा हप्ता जमा : थेट 'या' लिंकवरून तपासा तुमच्या खात्यातील पैसे - pm kisan 18th installment

PM kisan 18th installment : PM KISAN योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जामा झाला. तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याची खात्री करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

By ETV Bharat Tech Team

Published : 4 hours ago

Updated : 3 hours ago

PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Etv Bharat MH Desk)

हैदराबाद PM kisan 18th installment :पीएम किसानयोजनेअंतर्गत, केंद्र सरकारनं पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम हस्तांतरित केलीय. आतापर्यंत सरकारनं शेतकऱ्यांना 18 हप्त्यांचं अनुदान दिलं आहे. तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचं स्टेटस पहायचं असल्यासं दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा.

PM KISAN 18वा हप्ता :आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिममध्ये PM-KISAN सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केलाय. या योजनेअंतर्गत 20 हजार कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आली. पीएम किसान योजनेअंतर्गत, प्रत्येक शेतकरी कुटुंबाला वार्षिक 6 ची आर्थिक मदत सरकार करतंय. ही रक्कम शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.

17 वा हप्ता जूनमध्ये जमा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 जून 2024 रोजी त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमधून 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला होता. याअंतर्गत 9.26 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. आता 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.

अधिकृत वेबसाइटला भेट द्या :पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसे खात्यावर जमा झाल्याची स्थिती पाहण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला (pmkisan.gov.in) भेट द्यावी लागणार आहे.

  • तिथं गेल्यावर होमपेजवरील "फार्मर्स कॉर्नर" विभागात "लाभार्थी स्थिती" लिंकवर क्लिक करा.
  • येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकून सबमिट करा.
  • त्यानंतर इथं तुम्हाला तुमची पेमेंट स्थिती दिसेल.
  • तुमच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले की, नाही ते सर्व तुम्ही इथं पाहू शकता.

शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ :PM KISAN योजना भारतातील लहान शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी राबण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडं 2 हेक्टरपर्यंत जमीन आहे, अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे वार्षिक सहा हजार रुपय दिले जातात. जगातील सर्वात मोठी थेट लाभ योजना आहे.

हे वाचलंत का :

  1. PM किसानच्या 18 व्या हप्त्यासाठी तत्काळ करा ई केवायसी, कसं करायचं E KYC? - PM Kisan Samman Nidhi
  2. पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू : 1 कोटी युवकांना रोजगाराची संधी, 'असा' करा अर्ज - Prime Minister Internship Scheme
  3. AB PM JAY योजनेत नागरिकांवर मोफत उपचार, 'असा' करा ऑनलाइन अर्ज - AB PM JAY Yojana
Last Updated : 3 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details