हैदराबाद : OnePlus ची फ्लॅगशिप सीरीज OnePlus 13 आणि OnePlus 13R च्या लॉंच तारखेची पुष्टी केली आहे. OnePlus Club या X खात्यावर याबाबत माहिती दिली आहे. OnePlus Club वर OnePlus 13 मालिका भारतात 7 जानेवारी 2025 रोजी रात्री 9 वाजता लॉंच होणार असल्याचं म्हटलं आहे. OnePlus हे दोन्ही फोन आपल्या इव्हेंटमध्ये सादर करणार असल्याचा दावा या खात्यावर करण्यात आलाय. OnePlus 13 मालिका आगोदरच चीनमध्ये सादर करण्यात आली आहे. त्यामुळं फोनच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल माहिती मिळवणं सोपं झालं आहे. आज आपण OnePlus 13 ची संभाव्य वैशिष्ट्ये आणि किंमत पाहूयात...
OnePlus 13 ची वैशिष्ट्ये :
डिस्प्ले :OnePlus 13 मध्ये 6.82-इंचाचा डिस्प्ले असणार आहे, जो OnePlus 12 सारखाच आहे. OnePlus 13 चा रिफ्रेश रेट 120Hz आणि QHD+ रिझोल्यूशन असेल.
प्रोसेसर :हुड अंतर्गत, OnePlus 13 क्वालकॉमच्या नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटसह येणार आहे. हे डिव्हाइस OxygenOS 15 वर चालेल, जे Android 15 वर आधारित आहे. OnePlus नं अद्याप OnePlus 13 साठी सॉफ्टवेअर अपडेट्सची पुष्टी केलेली नाही, परंतु मागील मॉडेल्सवर आधारित, ते चार वर्षांपर्यंत Android अपडेट आणि पाच वर्षांपर्यंत सुरक्षा अपडेट देण्याची शक्यता आहे.
बॅटरी : OnePlus 13 मध्ये एक मोठी अपग्रेड बॅटरी उपलब्ध असेल. OnePlus 13 फोन OnePlus 12 मध्ये असलेल्या 5,400mAh युनिटच्या तुलनेत 6,000mAh बॅटरीसह सुसज्ज आहे. हा फोन जवळपास दोन दिवस वापरता येईल, असा कंपनीचा दावा आहे. डिव्हाइस 100W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणार आहे.
कॅमेरा : कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झाल्यास, OnePlus 13 नं OnePlus 12 चा 50-megapixel LYT-808 प्राथमिक सेन्सर राखून यात दिला आले, परंतु त्याचं टेलीफोटो आणि अल्ट्रावाइड लेन्स 50-मेगापिक्सेलवर अपग्रेड केलं आहेत. फोनमध्ये हॅसलब्लॅड ब्रँडिंग आणि 4K/60fps डॉल्बी व्हिजन व्हिडिओ कॅप्चर देखील आहे.
इतर वैशिष्ट्ये : OnePlus 13 IP68 आणि IP69 रेट केलेलं आहे, याचा अर्थ फोन पाण्यात भिजला तरी खराब होणार नाही. हा फोन अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर वापरून ओल्या हातानंही अनलॉक करता येतो.
OnePlus 13 ची भारतात संभाव्य किंमत :OnePlus 13 ची किंमत 70 हजारांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. OnePlus 12 भारतात 64 हजार 999 रुपयांना लॉंच करण्यात आला होता.
हे वाचलंत का :
- AI फीचरसह सॅमसंग गॅलेक्सी बुक 5 प्रो लॅपटॉप लाँच, काय आहे खास?
- नोव्हेंबर 2024 मध्ये स्मार्टफोन निर्यातीत विक्रमी वाढ, एका महिन्यात 20 कोटींचा आकडा ओलांडला
- Lava Blaze Duo 5G भारतात लॉंच, जाणून घ्या एका क्लिकवर सर्व माहिती