मुंबई :भारतातील स्वदेशी इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या ओबेन इलेक्ट्रिकने दसरा उत्सवानिमित्त ग्राहकांवर विविध सवलतींचा वर्षाव सुरू केला आहे. दसरा उत्सव हंगामामध्ये ग्राहकांना १२ ऑक्टोबरपर्यंत ओबेन इलेक्ट्रिकची फ्लॅगशिप परफॉर्मन्स इलेक्ट्रिक मोटारसायकल ओबेन रोर ही १ लाख १९ हजार ९९९ रुपये एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येणार आहे. त्यामुळे या दुचाकीच्या १ लाख ४९ हजार ९९९ रुपये या मूळ एक्स-शोरूम किमतीवर ३० हजारांची बचत होणार आहे. तसेच प्रत्येक खरेदीबरोबर ५ वर्षांची वाढीव वॉरंटी आणि आयफोन १५, आयपॅड मिनी आणि सोनी हेडफोन जिंकण्याची संधीसुद्धा मिळणार आहे.
ओबेन रोरवर एकूण ६० हजारांपर्यंत बचत : सणासुदीच्या उत्साहाला वाढवण्यासाठी ओबेन इलेक्ट्रिकतर्फे बंगळुरू, दिल्ली आणि पुणे येथील शोरूममध्ये खास दसरा धमाल दिवसाचे आयोजन करण्यात येणार आहे. या एक दिवसाच्या विशेष कार्यक्रमांमुळे ग्राहकांना ओबेन रोरवर एकूण ६० हजारांपर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या उत्पादनाची किंमत ८९ हजार ९९९ रुपयांपर्यंत कमी होईल. बंगळुरू शहरातील कार्यक्रम २९ सप्टेंबरला होणार आहे, त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी दिल्ली आणि ६ ऑक्टोबर रोजी पुणे येथे हा सोहळा होणार आहे.
आमची इलेक्ट्रिक मोटारसायकल एक उत्तम पर्याय:ओबेन इलेक्ट्रिकच्या संस्थापक आणि सीईओ मधुमिता अग्रवाल यासंदर्भात माहिती देताना म्हणाल्या, “ दसरा सणासाठी आम्ही देत असलेली ऑफर म्हणजे भारताचे इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे जे संक्रमण होत आहे, त्या लोकांबरोबर हा आनंदाचा हंगाम साजरा करण्याचा आमचा मार्ग आहे. कामगिरी, सुरक्षितता आणि टिकाऊपणा या सर्व बाबतीत आमची इलेक्ट्रिक मोटारसायकल एक उत्तम पर्याय ठरावी, हे आमचे उद्दिष्ट आहे. सणासुदीच्या या काळात अधिकाधिक ग्राहकांना ओबेन इलेक्ट्रिकच्या नावीन्यपूर्ण ईव्ही मोटारसायकलची विश्वासार्हता आणि गुणवत्ता अनुभवता यावी, यासाठी आम्ही आकर्षक सवलती आणि ऑफर्स देण्यासाठी उत्सुक आहोत.” ओबेन इलेक्ट्रिक भारताच्या कानाकोपऱ्यात इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्युशन्स उपलब्ध करून देत आपली उपस्थिती सातत्याने वाढवत आहे. ब्रँडकडे असलेल्या एलएफपी बॅटरी तंत्रज्ञानामुळे उत्कृष्ट कामगिरीसह ५० टक्के जास्त उष्णतारोधक आणि मोटारसायकलला वाढीव आयुर्मान देऊ शकते.
हेही वाचा :
- फक्त 436 रुपयात मिळतोय 2 लाखांचा विमा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा 'असा' घ्या लाभ - PM Jeevan Jyoti Bima Yojana
- Citroen C3 Aircross ची नव्या लुकसह दमदार एंन्ट्री, इंजिनसह केला नावात बदल - Citroen C3 Aircross